Sunday, 24 June 2012

माहात्मा

facebook चा   वापर करणाऱ्या माझ्या सर्व मित्रांना  माझा नमस्कार ,आदाब ,सलाम ,सश्रीकाल .facebook वर काही गांधीजिवर टीका करणारे लेख वाचले काय गांधीजी खरच महात्मा होते .रंगीला गांधी ह्या नावाचे लेख मी facebook वर वाचलेत मीच नाही तर सर्वानीच वाचले असणार आणि काहींनी काहींनी म्हण्यापेक्षा बर्याच लोकांनी ते लेख शेयर हि केलेत .ते पाहून मला खूप दुख झाल आणि यावर काय बोलाव हे मला काही सूचना .परंतु यावर बोललाच पाहिजे म्हणून हा खटाटोप .
                                            काय गांधीजी खरच महात्मा आहेत का ? का यात काही  शंका आहे का ? असल्यास ती एका भारतीय करता खेदाची गोष्ट  आहे .मी म्हणतो  गांधीजी महात्मा होते आहेत आणि पुढेही राहणार आहेत .हे पहा मला जर प्रशिध्द होयाचे असेल आणि तितकी माझी लायकी नसेल तर मी काय करणार एखाद्या महान  व्यक्तीच्या  चारित्र्यावर  काहीतर बदनाम  कारक वक्तव्य करणार र मी आपोआपच प्रशिध्द होणार .हा प्रशिध्द चा मार्ग अनेक लोक वापरतात त्यातलाच हा प्रकार आहे .गांधीजी तर स्वताला कधीच महात्मा मनात नव्हते  ते तर स्वताला लहान आत्मा म्हणायचे .महान असूनही  स्वताला लहान समजणारे खरच महात्मा  असतात हे तर आपल्याला कळते ना .स्वातंत्र्याच्य पूर्वीच्या काळात गांधीजी वकील होते .त्यांना वाटल असते तर ते स्वत सुखात आयुष्य जगू शकले असते .परंतु माझे देश बांधव गरीब आहेत .त्यांना अंगावर घालण्यासाठी कपडे नाहीत म्हणून सुटाबुटात राहणाऱ्या गांधीजीनी सूट  घालयचे सोडून एका सुती धोतरावर  संपूर्ण आयुष्य काढाल.गरिबांना मीठ खायला मिळत नाही म्हणून दांडी या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह केला .आणि गरिबांना मीठ उपलब्ध करून दिल .म्हणून तर लोक गांधीजींना बापू  म्हणत होते .जगाला अहिंसेचा संदेश देणारे बापू महान नाहीत अस  म्हणायला आपली जीभ तरी कसी रेटते.आज अनेक भारतीय गांधीजीचा आदर्श घेऊन जीवन व्यतीत करत आहेत .ते लोक सुधा आपल्या दृष्टिन महान आहेत तर गांधीजी का  नाही .कोणी  आपल्या तोंडात मारली तर तुसरा गाल  त्याच्या पुढे करा म्हणणारे गांधीजी त्यांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला सहजच माफ करतील .परंतु माझ्या सारखा भारतीय त्याला माफ करणार नाही .त्याला निदान त्याच्या चुकीची जाणीव तरी  करून दिल्या शिवाय राहणार नाही .आरे ज्याने त्यांना गोळ्या घातल्या अश्या नथुराम गोडसेला  बापूनी माफ केल तर अश्या त्यांच्या चारित्र्यावर वाईट पुस्तक लिहणार्या  नालायक लेखकाल तर ते सहजच माफ करतील .ज्याने त्यांना गोळ्या  घातल्या अश्या नथुराम गोडसेला  देवा माफ कर त्याला महित नही कि तो काय करतोय  असा म्हणणाऱ्या बापुउला वाईट ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि नथुराम  गोडसेला महान बनवण्याचा प्रयत्न  खुद भारतीय राजकारणीच करत आहेत .नथुराम गोडसे चांगलाही असेल कदाचित परंतु त्याने त्याला देशासाठी प्रेमही असेल कदाचित म्हणून काय बापुना गोळी घालणे  हाच एक मार्ग होता का ? त्यामुळे त वाईटच आहे असा मी म्हणतो .कुठलीही हिंसा न करता भारताला स्वतंत्र मिळून देणारे बापू खरच महान होते यात कुठलीही शंका नाही .त्यांच्यावर आरोप करायचे असतील तर आधी त्यांच्या चारित्र्याचा चांगल अभ्यास करा मग त्यांच्याकडे बोट  उचला .एखादा लेख वाचून बापुना वाईट ठर्रवून मोकळे न होता त्यांच्या जीवनाचा अभ्यास करा .आणि मग ठरवा ते महान आहेत कि नाही .एक फक्त कल्पना करा कि बापू ऐवजी तुम्ही आहात आणि तुम्हाला नथुराम गोडसेनी गोळी घातली असती तर तुम्ही मरातानी  हे राम म्हणाला  असता का त्याला शिव्या दिल्या असत्या .खर खर सांगा 
                                    बापूनी देशाची फाळणी केली  असा म्हणून बापुना नाव ठेवणार्यांना मी सांगू इच्छितो कि फाळणीची मागणी हि पाकिस्तानचे राष्ट्र पिता जिना यांची होती .परंतु  ते गेले पाकिस्तानात निघून आणि आपण बापुनाच त्याचा दोषी मनात आहोत .तुम्ही सांगा एका एकत्र कुटुंबात दोन भावंड एकामेकाचा प्रचंड द्वेष करत असतील तर त्यांना घरचे वरिष्ठ लोक वेगळा संसार थाटून देत नाही का?तीच हि गोष्ट आहे .खरे देशाची फाळणी करणारे इंग्रज आहेत .त्यांनी फोडा व राज्य करा हि नीती वापरली  आणि  सख्या भावंड सारखे एकाच देशात राहणाऱ्या हिंदू आणि मुस्लीम भावंडात भांडण लाऊन दिली .आणि आपण गांधीजींना दोष देत आहोत .     















1 comment:

  1. अतिशय महत्वपूर्ण लेख , प्लीज फेसबुकवर ही Knowing Gandhism Global friends समूहात ही टाका अनेक समविचारी मित्र मिळतील . संकेत मुनोत ८०८७४४६३४६

    ReplyDelete