आपली भारतीय संस्कृती आतिशय महान आहे .तरी ती पूर्वी अंधश्रधा आणि कर्मकांड यामध्ये इतकी गुरफटली होती कि त्याचे अनेक वाईट परिणाम भारतीयांना भोगावे लागले .बालविवाह ,सती जाण्याची प्रथा ,बोकड आणि कोंबड मागणाऱ्या देवावर असणारी अंधभक्ती, ज्योतिषी ,भोंदूबाबा ,मांत्रिक यांच्या जाळ्यात भारतीय समाज पूर्णपणे अडकला होता .भोंदूबाबा आणि बळी मागणाऱ्या देवांनी अनेक निष्पापांचे बळी घेतले .उच-नीच ,स्पुर्ष-अस्पुर्ष ,पवित्र -अपवित्र हेच समज समाज मानत राहिला .माणूसच माणसाला नीच व हलका समजत होता .दलित लोकांचा स्पर्श हि अशुभ मनाला जायचा .तेव्हा महात्मा ज्योतिबा फुले ,लोकमान्य टिळक, राजर्षी शाहू महाराज ,बाबासाहेब आंबेडकर ,आगरकर ,अशा अनेक समाज सुधारकांनी अनिष्ट रूढी , अंधश्रधा यांच्या विरुद्ध समाजात प्रबोधन केले .त्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची केले .आणि आज आपण बर्याच अंशी सुधारलेला समाज बघतो आहे ते त्यांचेच फळ आहे .आज समजा जरी सुधारलेला वाटत आसला तरी तो अनेक प्रथा ,परमपरा नकळत किवा भीती पोटी पळत आहे .डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवत आहे .या प्रथा पाळण्या पूर्वी थोडा विचार करा .विचार करण्याची शक्ती भगवंताने फक्त माणसालाच दिल्याली आहे .तिचा थोडा उपयोग करा .प्रत्येक प्रथेची चीकीस्ता करा आणि त्यात काही तथ्य असेल तर आवश्य पाळा.नसेल तर मोडीत काढा .कारण कि हे काम आपल्यालाच करायचे आहे .
आजही कुंडली ,भविष्य पाहण्याचा फ्याड गेलेलं नाही .घरी एखाद बाळ जन्माला आला कि घरचे लगेच त्याची जन्मवेळ,जन्मठीकान,दिनांक ज्योतिषाला सांगून त्याची कुंडली तयार करून घेतात आणि मंग त्या कुंडलीतील ग्रह तारे त्या बाळाचं भविष्य ठरवतात . त्यावरून त्याची रास ठरवली जाते .आणि कुंडली वरून त्याच भविष्य सांगितलं जाते .ते योगायोगाने थोड्याफार अंशाने खरे ठरलेकी ते शाश्रीबुवा भविष्य अचूक सांगतात हे लोकांना पटवून देण्यात येते .आणि खोटे ठरलेकी तुमच्या कडून जन्मवेळ चुकली असेल हे सांगून ज्योतिषी मोकळा होतो.थोडा विचार करा .कि जन्मवेळ ,जन्मठीकान ,आणि जन्म दिनांकावरून जर कुंडली निघत असेल तर शहरात एकाच वेळेस ,एकाच दवाखान्यात कितेक बालकांचा जन्म होत असतो.तर त्यांची कुंडली एकाच निघणार नाही का ? मग काय त्या सर्वांचा भविष्य एकच आहे काय ?जन्म वेळ कोणती धरावी यातही हि शंका आहे.काही विद्वान म्हणतात कि गर्भ राहिला तेव्हा ची वेळ हि जन्म वेळ धरावी .कारण आईला आई होणार आहोत हे गर्भ राहिल्यावर काही दिवसात कळते .जो नऊ महिन्यांचा काळ आहे तो बाळाच्या वाढीचा काळ आहे.तरी याला ज्योतिषी मानायला तयार नाही .कारण ते म्हणतात कि बाळाचं जीवन कार्य ते जन्माला आल्यावर सुरु होते .हे जर खरे असेन तर .अभिमन्यू आईच्या गर्भात आसतानी चक्रव्याहू भेदायचा कस शिकला ?.भक्त प्रल्हाद भक्ती कराची कुठे शिकला? गर्भ संस्कार शिबीर का भरली जातात ?काही विदवान असंही म्हणतात कि बाळ जन्मले ती वेळ जन्म वेळ धरूया पण बाळ जन्मले हे केव्हा म्हणायचे . बाळाचं डोकं दिसायला लागल्यावर का कि नाळ कापल्यावर कि बाळ रडल्यावर .जर एक पळीचा अवधी हि कुंडली बदलू शकतो तर आपल्या कडे येवढा अचूक जन्मवेळ आहे का ?मग का ठेवायचा विश्वास आपल्या कुंडली वर
खरच ग्रह तारे आपल्या जीवनावर इतका असर टाकतात .हे ग्रह तारे फक्त हिंदुच्याचा मानागुटावर बसतात का?ग्रह आणि तारे आपल्याला अनुकूल होण्यासाठी ज्योतिषी आपल्याला काही रत्नाच्या आंगठ्या ,माळी घालायला देतात .त्यामुळे आपल्या आडचणी कमी होऊन आपण खूप यश संपादित करतो .हे कितपत आपल्या बुद्धीला पटतय .अश्या माळा आणि अंगठ्या घालून जर नशीब बदलले आसते तर कर्म ,कष्ट ,मेहनत ,जिद्द ,आत्मविश्वास ,प्रयत्न यावरचा लोकांचा विश्वासच उडून गेला आसता .नशीब बदलायचे असेल तर विचार बदला ,कष्ट करण्याची तयारी ठेवा ..आणि कुठल्याही आडचनीला, संकटाला सामोरे जाण्याची ताकत ठेवा. .मेहनत आणि विचाराच्या जोरावर तुम्ही नशीब बदलू शकता हे लक्षात ठेवा .संत तुलशिदासाच्या कुंडली मध्ये सामान्य स्त्री शी लग्न होईल आस लिहिलेल होत .परंतु तुलशिदासानी रत्नावली नावाच्या अतिशय सुंदर अश्या स्त्री शी विवाह केला .याचा आर्थ आपणच आपले नशीब घडवू शकतो आणि बिघडवू शकतो .आता आपणच ठरवायचं आहे घडायचं कि बिघडायच .कारण तुच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार . टीवीवर एका कार्यक्रमात राशी वरून स्वभाव सांगतात. लोक ते आवडीने ऐकतात .आमुक आमुक राशीचे व्यक्ती अमुक अमुक स्वभावाचे असतात असे सांगितले जाते .राशी वरून जर स्वभाव असतील तर .जेल मध्ये शिक्षा भोगत असणारे कैदी विशिष्ट राशीचेचा असतील .सज्जन व्यक्ती विशिष्ट राशीचेचा असतील .एकाच राशी चा संत आणि एकाच राशीचा दरोडेखोर आढळणार नाही का ?भारताची लोकसंख्या १२० कोटी आहे आणि राशी १२ आहेत तर एका राशीच्या वाट्याला १० कोटी लोक येतात .तर १० कोटी लोकांचा स्वभाव सारखाच आहे का?
कुंडली वरून आपल्या कुंडलीत मृत्यू योग आहे का हे समजते हे जर खरे असेल तर जपान मध्ये जेव्हा अणुबॉम्ब पडला तेव्हा अनेक क मृत्युमुखी पडले तेव्हा त्यांच्या सर्वांच्या कुंडलीत एकाच वेळी मृत्युयोग लिहिला होता काय ? यावरूनच कुंडलीला भविष्याला काहीच शास्त्रीय आधार नाही हे सिद्ध होते .
लग्न आणि कुंडली -हिंदू संस्कृती मध्ये आजही बरेच लोक लग्नापूर्वी वधु वरच्या कुंडल्या जुळवून पाहतात .ब्राम्हण वधु वरच्या कुंडलीचे गुण मिलन करतो ,त्यामध्ये मंगळ ,एकनाड ,षडाष्टक ,शांती वैगरे आहे का ते पाहतो
गुणमिलन - वधु वराच्या कुंडल्याला विवाहाच्या दृष्टीन किती गुण पडतात याला गुणमिलन म्हणतात .गुनामिलाना मध्ये वर्णगुनाला१,वैश्यागुनाला २,तारागुनाला ३,योनिगुनाला ४,,ग्रह मैत्री गुणाला ५,गण गुणाला 6 ,राशीकुटगुणाला ७,नाडीगुणाला ८,अशाप्रकारे गुण दिले जातात .याची पद्धत परीक्षेमध्ये कोणत्या प्रश्नाला किती गुण या प्रकारची आहे .तस पाहिलतर या गुनापेक्षा वधु वरचा व्यक्तिमत्व कसा आहे .त्यांच्या मध्ये चातुर्य,जिद्द ,विधायक दृष्टीकोन ,योग्य निर्णया घेण्याची क्षमता ,समजुदारपणा,हे गुण आहेतकी नाही हे पहिले पाहिजे .गुण जुळून मन जुळतील याची काही शाश्वती नाही .गुण जुळूनही मन न जुळलेली लोक फुटा फुटा वर सापडतील . आणि गुण न जुळताही सुखी संसार करणारी जोडपी सापडतील .कुंडल्या जुळून केलेले सर्वच लग्न यशस्वी झालेत का ? गुण जुळून जर लग्न यशस्वी होणार असेल तर विवाहापूर्वी मुलगी मुलगा पाहण्याच्या कार्यक्रमाला काय अर्थ ? जे लोक प्रेंम विवाह करतात ते काय गुण जुळवतात कि कुंडल्या पाहतात ?त्यांनी काय कुंडली पाहून प्रेम केल होत ? नाही ना मग आता या गुनामिलानाचा तुम्हीच विचार करा
मंगळदोष - लग्नात विघ्न घालण्यात या मंगळाचा पहिला नंबर आहे .मंगळ असलेल्या मुलीशी लग्न केल्यास लवकरच मृत्यु होतो .आणि त्या मुलीच्या नशिबी वैधव्य योग येतो.आसा या मंगळाचा महिमा आहे.लग्न या पवित्र संस्कारात ब्राम्हणांनी फक्त स्वताच पोट भरण्यासाठी किती भीती निर्माण केली आहे .४०% लोकांच्या कुंडली मध्ये हा मंगळ ठाण मांडून बसलेला आहे.मन काय यांची लग्न होणार नाहीत.मग त्या साठी या मंगळाचे ३ प्रकार पडण्यत आले .कडक ,सौम्य , क्षम्य मंगळ ,मग याचा आधार घेऊन हे ब्राम्हण या मंगळ्या मुली कटवायला लागले .मंगळी मुलगी घरात जन्माला आली कि घरच्यांना ते खूप मोठा संकट आहे आस वाटायला लागल.मग ब्राम्हणाला दक्षणा देवून तिचा कसतरी लग्न लाऊन द्या .आस विचार फोफावत चालला .आणि ब्राम्हनालाही तेच हवं होत .या मंगळाची एक गंमत आहे बघा .मंगळ्या मुलाचा विवाह मंगळ नसलेल्या मुलीशी होऊ शकतो पण मंगळ्या मुलीला मंगळ्याच मुलगा लागतो .नाहीतर मंग वैधव्य योग निश्चित आहे .मंगळ्या मुलीशी लग्न करून हि जिवंत असणारे लोक आहेत .मंगळ असणाऱ्या व्यक्तीचे विवाह झाले आहेत .मग काय साऱ्याच मुली विधवा झाल्यात ? अस आढळतका कि कुंडली पूर्ण जुळूनही मुलीच्या नशिबी वैधव्य योग येत नाही .इतर धर्मातील लोक कुंडली न पाहत विवाह करतात त्यामुळे त्यांच्यात मंगळ्या मुलीचा चांगल्या मुलाशी विवाह होण्याची शक्यात जास्त आहे .तर त्यांच्यात हिंदू महिला पेक्ष्या जास्त विधवा महिला आढळतात का ?नाही ना मग यात काय तथ्य आहे.
कुंडल्या पाहतोत ते आपले पूर्वज पाहत होते का?वर किव्हा वधू एकमेकास योग्य आहेत का नाही हे ते कसे ठरवायचे .खरच विवाहाच्या बाबतीत ते आपल्या पेक्षाही प्रगत होते .पूर्वी मुलगी लग्न योग्य झाली कि तीच स्वयंवर आयोजित केल जायचं.त्यात एखादी आवघड स्पर्धा ठेवली जायची आणि जो जिंकेल त्याच्याशी ती मुलगी विवाह करायची .जो सर्व पेक्षा सामर्थ्यवान ,शक्तिवान आणि विद्वान असायचा तो जिंकायचा आणि त्या मुलीचा पती होयाचा .म्हणजे या मागचा उदेश काय कि मुलाच्या कुंडलीचे गुण नाही तर त्या मुलामध्ये असणारे गुण पाहून मुलगी दिली जायची .अर्जुनाचा आणि द्रौपातीचा विवाह कसा झाला होता कुंडली जुळून का ?सामर्थ्य पाहून . रामायणा मध्ये राम आणि सीते चा विवाह कसा झाला होता ?त्या काळात रामाने आणि अर्जुनानीच आस विवाह केला होता अस नाही तर .त्या वेळची वर निवडायची पद्धतच तशी होती .आता आपणच ठरवायचं कि आपल्या संस्कृतील जे दोन महान ग्रंथ आहेत त्यातच उल्लेख केलेला आहे कि साक्षात देवच ह्या कुंडल्या पाहत नव्हते तर आपण का पहाव्यात .?आता आपणच ठरवायचा कि रामाच्या पावलावर पाऊल ठेऊन चालायचा कि गावातील त्या बाम्हनाच्या म्हणण्यानुसार वागायचं कि ज्याला त्याचाच भविष्य माहित नाही
मंगळदोष - लग्नात विघ्न घालण्यात या मंगळाचा पहिला नंबर आहे .मंगळ असलेल्या मुलीशी लग्न केल्यास लवकरच मृत्यु होतो .आणि त्या मुलीच्या नशिबी वैधव्य योग येतो.आसा या मंगळाचा महिमा आहे.लग्न या पवित्र संस्कारात ब्राम्हणांनी फक्त स्वताच पोट भरण्यासाठी किती भीती निर्माण केली आहे .४०% लोकांच्या कुंडली मध्ये हा मंगळ ठाण मांडून बसलेला आहे.मन काय यांची लग्न होणार नाहीत.मग त्या साठी या मंगळाचे ३ प्रकार पडण्यत आले .कडक ,सौम्य , क्षम्य मंगळ ,मग याचा आधार घेऊन हे ब्राम्हण या मंगळ्या मुली कटवायला लागले .मंगळी मुलगी घरात जन्माला आली कि घरच्यांना ते खूप मोठा संकट आहे आस वाटायला लागल.मग ब्राम्हणाला दक्षणा देवून तिचा कसतरी लग्न लाऊन द्या .आस विचार फोफावत चालला .आणि ब्राम्हनालाही तेच हवं होत .या मंगळाची एक गंमत आहे बघा .मंगळ्या मुलाचा विवाह मंगळ नसलेल्या मुलीशी होऊ शकतो पण मंगळ्या मुलीला मंगळ्याच मुलगा लागतो .नाहीतर मंग वैधव्य योग निश्चित आहे .मंगळ्या मुलीशी लग्न करून हि जिवंत असणारे लोक आहेत .मंगळ असणाऱ्या व्यक्तीचे विवाह झाले आहेत .मग काय साऱ्याच मुली विधवा झाल्यात ? अस आढळतका कि कुंडली पूर्ण जुळूनही मुलीच्या नशिबी वैधव्य योग येत नाही .इतर धर्मातील लोक कुंडली न पाहत विवाह करतात त्यामुळे त्यांच्यात मंगळ्या मुलीचा चांगल्या मुलाशी विवाह होण्याची शक्यात जास्त आहे .तर त्यांच्यात हिंदू महिला पेक्ष्या जास्त विधवा महिला आढळतात का ?नाही ना मग यात काय तथ्य आहे.एकनाड - एकनाड हि संकल्पनाच खोटी आहे .याचा संबंध संतती होण्याशी जोडला गेलेला आहे .एकनाड असल्यास संतती होत नाही .ज्या व्यक्तीची एकनाड आहे अश्या व्यक्तीच लग्न ज्योतिष शास्राने वर्ज्य मानलं आहे.रक्त गट एक असल्यास संतती होत नाही अस विज्ञान सांगत .मग एक नाडीचा संबंध रक्त गटाशी जोडला जातो .नाड्या तीन आहेत आद्य ,मध्य ,आणि शेवट या तीन नाड्या आणि रक्त गट आठ आहेत .तर यांचा ताळमेळ कसा घालायचा .एकनाड असूनही मुले झालेली जोडपी मी खूप पाहेलेली आहेत.रक्त गट एक असेल अन एकाचा +ve असेल आणि दुसर्याच - ve असेल तरी त्यांना पहिले मुल होते अन दुसर्या मुलाला होण्यासाठी त्यांना आडचन निर्माण होते .पण वैद्यक शास्रात त्यावरही उपाय आहे .रक्त गट वेगळे आसतील आणि नाडी एक असेल तर बिनधास्त विवाह कर .तुम्हाला नक्कीच संतती होईल याची मी शाश्वती देतो .ह्या एकनाड मुळे ७५% विवाह नाकारले जातात .ह्या एकानाडीला कोणताही अर्थ नसताना चांगल्या मुलीला आणि मुलाला नकार देण हि चुकीची गोष्ट आहे.
षडाष्टक - समजा तुमची रस धनु आहे .आणि तुम्हाला सांगून आलेली जोडीदाराची रस वृषभ आहे .धनु पासून वृषभ रस मोजत गेल्यास ६ येते आणि वृषभ पासून धनु येते ८ .६आनि ८ या ला म्हणतात षडाष्टक .६आनि८ या अंतरातील राशींचे स्वभाव भिन्न असतात .त्यामुळे त्याचं आजीबात पटत नाही .आणि त्या दोघांचे सारखे भांडण होत राहतात आणि मग एक दिवस हे भांडण विकोपाला जाऊन त्याच रुपांतर घटस्पोटात होते आस ज्योतिषशास्र सांगत .याचा विश्लेषण आपण आधीचा केलेलं आहे .राशीवरून जर स्वभाव असतील तर आपली
सारख्या स्वभावाचे भारतात १० कोटी लोक सापडतील आणि आपल्याशी षडाष्टक दोष असणारे १० कोटी लोक असतील .मग आपल्याशी भांडण होणारे लोक किती आहेत बघा .आपल आयुष्य भांडता भांडताच निघून जाईल .समजुदारपना हा भांड्नावरील रामबाण उपाय आहे .तुम्ही जर समजुदार नसाल .दुस्याशी जमून घेण्याची ताकत नसेल तर तर तुमचं कोणाशीही लग्न होउद्या तुमचे भांडण होतीलच.आणि तुम्ही मुळातच भांडकुदळ आसल तर आणि भांडणच तुम्हाला प्रिय आसतील तर तुम्ही ब्रम्हचारी राहणेच योग्य आहे .भांडण होत नाही आसं जोडप जगाच्या पाठीवर कुठे आहे का ?भांडण होणारच आहेत पण ती विकोपाला जाऊ न देण्याच काम ह्या दोघाच आहे .षडाष्टक सारखे प्रश्न निर्माण करून भीती निर्माण करायची आणि या भिती च्या जोरावरच आपली उपजीविका चालवायची . हीच ज्योतिषांची हुशारी आहे .त्यामुळे भीती कशाचीही बाळगू नका .जितके तुम्ही घाबरतान तितक्याच आडचणी तुमच्या मागे लागतील .तुम्ही ती जाहिरात पहिलीत का त्यात एक वाक्य आहे. डरसे मत डरो डर के आगे जीत है
महाभारत ,रामायण आणि विवाह पद्धती - कधी विचार केलाय का आपण आज जे विवाह पूर्वी ज्या
कुंडल्या पाहतोत ते आपले पूर्वज पाहत होते का?वर किव्हा वधू एकमेकास योग्य आहेत का नाही हे ते कसे ठरवायचे .खरच विवाहाच्या बाबतीत ते आपल्या पेक्षाही प्रगत होते .पूर्वी मुलगी लग्न योग्य झाली कि तीच स्वयंवर आयोजित केल जायचं.त्यात एखादी आवघड स्पर्धा ठेवली जायची आणि जो जिंकेल त्याच्याशी ती मुलगी विवाह करायची .जो सर्व पेक्षा सामर्थ्यवान ,शक्तिवान आणि विद्वान असायचा तो जिंकायचा आणि त्या मुलीचा पती होयाचा .म्हणजे या मागचा उदेश काय कि मुलाच्या कुंडलीचे गुण नाही तर त्या मुलामध्ये असणारे गुण पाहून मुलगी दिली जायची .अर्जुनाचा आणि द्रौपातीचा विवाह कसा झाला होता कुंडली जुळून का ?सामर्थ्य पाहून . रामायणा मध्ये राम आणि सीते चा विवाह कसा झाला होता ?त्या काळात रामाने आणि अर्जुनानीच आस विवाह केला होता अस नाही तर .त्या वेळची वर निवडायची पद्धतच तशी होती .आता आपणच ठरवायचं कि आपल्या संस्कृतील जे दोन महान ग्रंथ आहेत त्यातच उल्लेख केलेला आहे कि साक्षात देवच ह्या कुंडल्या पाहत नव्हते तर आपण का पहाव्यात .?आता आपणच ठरवायचा कि रामाच्या पावलावर पाऊल ठेऊन चालायचा कि गावातील त्या बाम्हनाच्या म्हणण्यानुसार वागायचं कि ज्याला त्याचाच भविष्य माहित नाही .


